Madh-Versova Bridge: मढ-वर्सोवा चा प्रवास होणार आता अवघ्या 10 मिनिटांचा, CRZ क्लिअरन्स
या ब्रिजमुळे CO2 emission 93% कमी होणार आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (Maharashtra Coastal Zone Management Authority )कडून वर्सोवा खाडी (Versova Creek) वरून मढ आयलंडला (Madh Island) जोडणार्या पूलाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्याला CRZ क्लिअरन्स मिळाल्याने आता मुंबईकरांची अजून थोडी वाहतूक कोंडीमधून सुटका होण्याची चिन्हं आहेत. वर्सोवा- मढ पूलामुळे जिथे 22 किमीचा रस्तापार करण्यासाठी सुमारे दीड तासाचा वेळ लागत होता तो भविष्यात केवळ दीड किमीचा होईल आणि त्यासाठी अवघी 10 मिनिटं लागणार आहेत.
सध्या वर्सोवा-मढ दरम्यान फेरी द्वारा प्रवास केला जात आहे. या फेरी प्रवासामध्ये नागरिक आणि दुचाकींदेखील वाहतूक होते. गुरूवारी झालेल्या MCZMA च्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. नक्की वाचा: Mumbai Traffic Updates: JVLR पूलाचा उत्तरेकडील मार्ग आता वाहतुकीसाठी खुला - ट्राफिक विभागाची माहिती.
वर्सोवा-मढ ब्रिजमुळे या भागातील मासेमार, सामान्य नागरिक यांना फायदा होणार आहे. या ब्रिजमुळे CO2 emission 93% कमी होणार आहे. बीएमसी कडून यापूर्वी सादर करण्यात आलेल्या नोट्समध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्यात फायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पूलामुळे अंधेरी, मढ, बोरिवली आणि गोराई भागातील वाहतूक सुधारणार आहे.
दरम्यान याव्यतिरिक्त मार्वे-मनोरी यांना जोडणारा पूल, ओशिवरा नदीवर आणि मालाड खाडी जोडणारा पूल, आहे. मढ खाडी वर धारिवली पूलावरील पूल देखील वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.