Loudspeaker Controversy: राज्यात 2,300 हून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई; 7000 जणांना कलम 149 CrPC अंतर्गत नोटीस

2,300 हून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली

पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

सध्या राज्यात लाऊडस्पीकरबाबत नवा वाद उफाळला आहे. मशिदींच्यावरील लाऊडस्पीकर खाली उतरवा अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्वभुमीवर राज्यातील (मुंबई वगळून) अंदाजे 1,500 मशिदी आणि 1,300 मंदिरांना लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2,300 हून अधिक लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 3 व 4 मे रोजी सुमारे 7000 जणांना कलम 149 CrPC अंतर्गत नोटीस देण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती दिली.