Lok Sabha Elections 2024: ठाकरे गटाने लोकसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर करताच कॉंग्रेस कडूनही उघड नाराजी व्यक्त; सांगली, दक्षिण मध्य मुंबई च्या जागेवर पुनर्विचार केला पाहिजे - बाळासाहेब थोरात
ठाकरे गटाची कॉंग्रेस सोबतची युती ही आत्मघातकी ठरण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.
लोकसभा निवडणूकीसाठी सारेच पक्ष आता तयारीला लागले आहेत. कुठे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर कुठे उमेदवार याद्यांवरून आघाडी- बिघाडी होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतून आधी वंचित दूर झाली आणि आता शिवसेना ठाकरे गटाने आज पहिली यादी जाहीर करताच कॉंग्रेसनेही नाराजी बोलून दाखवली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्म हा सगळ्यांनी पाळला पाहिजे असं म्हणत सांगली, दक्षिण मध्य मुंबई च्या जागेवर ठाकरे गटाने पुन्हा विचार व्हावा असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या प्रमाणेच संजय निरूपम यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाची कॉंग्रेस सोबतची युती ही आत्मघातकी ठरण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. तसेच आता कॉंग्रेस नेतृत्त्वाला काहीही पडली नाही असं म्हटलं आहे. तर झिशान सिद्दीकीने देखील ट्वीटर वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आघाडी मध्ये कॉंग्रेसला दुय्यम स्थान देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. Sanjay Nirupam Video: संजय निरुपम यांचा काँग्रेस नेतृत्वाला इशारा, 'जास्तीत जास्त एक आठवडा थांबेन आणि मग निर्णय घेईन' .
बाळासाहेब थोरात
झिशान सिद्दीकी
संजय निरूपम
महाराष्ट्रात महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्र आहेत. मात्र जागावाटपावरून अद्याप तिढा कायम आहे. देशात लोकसभेसाठी पहिलं मतदान 19 एप्रिलला आहे. 1 जून पर्यंत 7 टप्प्यात मतदान होणार असून 4 जूनला मतदानाचा निकाल आहे.