Lok Sabha Elections 2024: सातारा मध्ये उदयनराजेंविरोधात पुन्हा अभिजीत बिचुकले रिंगणात; 19 एप्रिलला भरणार उमेदवारी अर्ज
त्यांनी 2004 पासून उदयनराजेंच्या विरोधात 4 लोकसभा निवडणूका लढवल्या आहेत.
राष्ट्रवादीचा दबदबा असलेली सातारा (Satara) ची लोकसभेची जागा भाजपाने बळकावत तेथे महायुतीने भाजपाकडून छत्रपति उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली आहे. सध्या राज्यसभेचे खासदार असलेले उदयराजे आता लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरूद्ध पुन्हा बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichkule) निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. 19 एप्रिल दिवशी अभिजीत बिचुकले आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
अभिजित बिचुकले हे मूळचे सातार्याचे रहिवासी आहेत. त्यांनी 2004 पासून उदयनराजेंच्या विरोधात 4 निवडणूका लढवल्या आहेत. यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. परंतू 2009 मध्ये त्यांना 12 हजारांहून जास्त मतदान केलं होतं. अभिजीत बिचुकलेंनी गल्ली ते दिल्ली पर्यंत त्यांनी अनेक निवडणूकांमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. आता ते पुन्हा लोकसभेत उदयनराजेंच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. 2014 च्या विधानसभेतही त्यांनी वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज केला होता. मात्र या निवडणूकीतही त्यांचं डिपॉजिट जप्त झाले होते. कसबा पोट निवडणूकीतही भाजपच्या हेमंत रासने, कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांसमोर त्यांनी निवडणूक लढवली होती. नक्की वाचा: Sharad Pawar Collar Video : साताऱ्यात राजकीय तापमान वाढलं; कॉलर उडवून शरद पवारांचं एक प्रकारे उदयनराजेंना चॅलेंज (watch video) .
सातारा मध्ये उदयनराजेंविरूद्ध अभिजित बिचुकले यांचं वैर सर्वश्रूत आहे. मीडीयाशी बोलताना,"छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा द्यायची आहे. त्यासाठी आपण निवडणूकीला उतरणार आहोत असं अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे. शरद पवारांनी सातारा मधून मविआ चे उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.