Lok Sabha Elections 2019: राजेंद्र गवित शिवसेना पक्षाचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार; 'मातोश्री'वर शिवसेनेत प्रवेश

त्यामुळे राजेंद्र गावित आणि नरेंद्र पाटील या दोघांनी अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

Rajendra Gavit (Archived, edited, representative images) | Photo Credits: Twitter

Palghar Lok Sabha Constituency: शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणूकांसाठी पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. या यादीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र पालघर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम होता. पण आज शिवसेनेकडून राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पालघरमध्ये ते लोकसभेच्या रिंगणात शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार असण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.  Lok Sabha Elections 2019: शिवसेना पक्षाची पहिली 21 उमेदवार यादी जाहीर

पालघर पोटनिवडणूकीमध्ये श्रीनिवास वनगा यांचं नावं घोषित होणार अशी शक्यता होती, मात्र अखेरच्या क्षणी काही गोष्टी बदलल्या आणि राजेंद्र गावित यांना उमेदवारी घोषित करण्यात आलं आहे. राजेंद्र गावित यांनी आज मातोश्रीवर कार्यकर्त्यांसह  हजर झाले. सोमावार रात्रीपासून वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राजकीय खलबतं सुरू होती. श्रीनिवास वानगांना आमदारकीचं आश्वासन देण्यात आलं आहे.  Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक

पालघर मधून राजेंद्र गावित तर सातार्‍यातून नरेंद्र पाटीला शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. यंदा लोकसभेच्या जागांसाठी शिवसेना आणि भाजपपक्षामध्ये युती झाली असून भाजपा 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. त्यामुळे राजेंद्र गावित आणि नरेंद्र पाटील या दोघांनी अधिकृतपणे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.