राज ठाकरे यांच्या प्रचारसभा कोणासाठी? विनोद तावडे यांचे मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांना पत्र
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरुद्ध राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा घेण्याचे राज ठाकरे यांनी ठरवले आहे. मात्र आता या प्रचारसभांवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच प्रकरणी आता भाजपा (BJP) महाराष्ट्र लोकसभा निवडणुक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawade )यांनी राज ठाकरे यांची प्रचारसभा कोणासाठी असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच राज्य निवडणुक आयोगाने (Election Commission) यासंबंधित उत्तर द्यावे अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी अश्विनी कुमार यांना विनोद तावडे यांनी पत्र लिहिले आहे. तर राज ठाकरे यांच्या राज्यात प्रचारसभा होत असून मोदी यांच्या विरुद्ध बोलले जात आहे. तसे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडणुन द्या असे आवाहन राज ठाकरे यांच्याकडून केले जात आहे. तसेच या प्रचारसभेचा खर्च कोणताच उमेदवार प्रचार खर्चात दाखवत नाही. त्यामुळे निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार हा खर्च कोणाच्या खात्यात जमा आहे हे स्पष्ट होत नसल्याचे तावडे यांनी पत्रात लिहिले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा नसल्यास निवडणुक आयोग हस्तक्षेप करत नाही- माजी निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण)
तसेच राज ठाकरे हे राज्यात कोणत्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेत आहे याचे सुद्धा स्पष्टीकरण त्यांनी द्यावे असे म्हटले आहे. तर राज ठाकरे घेत असलेल्या प्रचारसभा राजकीय असल्याचे ही विनोद तावडे यांनी पत्रातून लिहिले आहे.