शिवसेना उपनेतेपदी प्रियंका चतुर्देवी यांची नियुक्ती

काँग्रेस (Congress) पक्षातून बाहेर पडल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला.

प्रियंका चतुर्वेदी (Photo Credits-Twitter)

काँग्रेस (Congress) पक्षातून बाहेर पडल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला. तर आता प्रियंका चतुर्वेदी यांना पक्षाकडून उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षात प्रवेश केल्याच्या 1 आठवड्यानंतर त्यांना हे पद देण्यात आले आहे. तर 19 एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत प्रियंका यांनी पक्षात प्रवेष केला होता.

उपनेते पदाची जबाबदारी दिल्यानंतर प्रियंका यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. त्यावेळी प्रियंका यांनी पक्षासाठी नेहमीच कार्यरत असणार असल्याचे म्हटले आहे. तर फेसबुकवरुन ही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. शिवसेनेत पदानुक्रमानुसार, पक्षाच्या अध्यक्षांच्या नंतर उपनेते पद महत्वपूर्ण असते. पक्षात 12 नेते आणि 24 उपनेते असतात.(काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी सोडला पक्ष, शिवसेनेत प्रवेश )

प्रियंका यांनी काँग्रेस पक्षावर आरोप करत असे म्हटले की, मेहनत करणाऱ्यांपेक्षा पक्षात गुडांनाच जास्त मान दिला जातो. तसेच कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्या प्रती केलेल्या वर्तनाचा खुलासासुद्धा ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केला होता.