रावेर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेसाठी जनतेने फिरवली पाठ

रावेर (Raver) येथे आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Photo Credit : Facebook, Devendra Fadnavis)

रावेर (Raver) येथे आज (19 एप्रिल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भाजप पक्षाच्या प्रचारसभेला जनेतेने पाठ दाखवली आहे. तसेच सभेसाठी आयोजन करण्यात आलेल्या ठिकाणी गर्दी पाहता तेथील अर्ध्यापेक्षा खुर्च्या रिकाम्या असलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील रावेर येथे फडवणीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. परंतु जनतेपेक्षा कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. सध्या तापमानाचा पारा सुद्धा वाढला आहे. त्यासाठी मंडप घालण्यात आला. तरीही लोकांनी या सभेला पाठ दाखवल्याचा प्रकार घडला आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: आचार संहिता भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने दाखल केली तक्रार)

देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन दुपारी 1 वाजता करण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना सभास्थळी पोहचण्यास उशिर झाल्याने ते 3 वाजता पोहचले. परंतु कार्यकर्त्यांनी या सभेसाठी सकाळपासून कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते.