Lok Sabha Elections 2019: मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात प्रचारसभा घेणार, सूत्रांनी दिली माहिती

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. याच पार्श्वभुमीवर राज ठाकरे राज्यात 8 ते 9 ठिकाणी प्रचारसभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. परंतु काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी (NCP) आघाडीच्या मंचावर ही प्रचारसभा घेणार नसून तर मनसे स्वतंत्र मंचावर सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यंदाची निवडणुक लढवणार नाही परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध प्रचार करण्याची घोषणा राज ठाकरे यांनी यापूर्वी केली होती. यामुळे महाघाडीला फायदा होणार असून उमेदवरांच्या मतदारसंघात जाऊन राज ठाकरे मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. परंतु नेमक्या कोणत्या तारखेला या प्रचारसभा असणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी उर्मिला मतोंडकर हिने मागितला राज ठाकरे यांच्याकडे मदतीचा हात, मनसे देणार का साथ?)

या भागात प्रचार सभा घेण्याची शक्यता:

सातारा- उदयनराजे भोसले

नांदेड- अशोक चव्हाण

सोलापूर- सुशीलकुमार शिंदे

बारामती-सुप्रिया सुळे

मावळ- पार्थ पवार

नाशिक- समीर भुजबळ

ईशान्य मुंबई-संजयदीना पाटील

उत्तर मुंबई- उर्मिला मातोंडकर

उत्तर मध्य मुंबई- प्रिया दत्त

सोलापूर, सातारा, नांदेड, मुंबई, पुणे आणि नाशिकसह अन्य भागातून मनसेकडून प्रचारसभा घेण्यात येणार आहे. तर गुढीपाडव्याच्या मेळाव्यादिवशी या बद्दल अधिकृतरित्या घोषणा करणार असल्याचे   सांगण्यात येत आहे.