Lok Sabha Elections 2019: ईशान्य मुंबईतून उमेदवारीचा पत्ता कट झाल्यानंतर नाराजी नाही तर जल्लोषाचा दिवस, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
तर भाजप विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असला तरीही त्यांनी नाराजी व्यक्त केली नसून हा तर जल्लोषाटचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुकीसाठी ईशान्य मुंबई मतदार संघातून (Mumbai North East Lok Sabha constituency) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. तर आज भाजप (BJP) पक्षाकडून मनोज कोटक (Manoj Kotak) यांना आगामी लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असला तरीही त्यांनी नाराजी व्यक्त केली नसून हा तर जल्लोषाटचा दिवस असल्याचे म्हटले आहे.
ईशान्य मुंबई येथून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आल्याने किरीट सोमय्या यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच लहान भावाला तिकिट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत सोमय्या यांनी जल्लोष करण्याचा दिवस असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत कोटक हे मुंबईच्या खासदारासह उत्तम प्रचिनिधीत्व पार पाडणार असल्याचा अंदाज ही सोमय्या यांनी यावेळी केला आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या यांच्या ऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर)
ANI ट्वीट:
तर मनोज कोटक यांनी पक्षाचे आभार मानले असून माझ्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचसोबत किरीट सोमय्या यांनी त्यांच्या कामाचा ठसा ईशान्य मुंबईत यशस्वीपणे उमटवला आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईसह संपूर्ण शहराच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर असल्याचे कोटक यांनी म्हटले आहे.