भाजप पक्षाची बारामती येथे सत्ता आल्यास राजकरणातून निवृत्ती घेईन- अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (23 एप्रिल) बारामती (Baramti) येथे मतदान केल्यानंतर मोठे विधान केले आहे.
आज (23 एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (23 एप्रिल) बारामती (Baramti) येथे मतदान केल्यानंतर मोठे विधान केले आहे.
काटेवाडी जिल्ह्याकील परिषद शाळेत अजित पवार यांनी आज मतदान केले. त्यानंतर पत्रकरांशी बोलताना पवार असे म्हणाले की, जर बारामती येथून भाजप पक्षाची सत्ता आल्यास मी राजकरणातून निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघामध्ये मतदान पार पडत आहे. तर बारामती येथे 100 टक्के विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. त्याचसोबत सुप्रिया सुळे यांना अधिक मते मिळतील असा अंदाज सुद्धा अजित पवार यांनी यावेळी वक्त केला आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019 Phase-3 Voting Maharashtra Live News Updates:लोकसभा निवडणूक मतदान अपडेट
तर बारामती येथे सुप्रिया सुळे यांना भाजप पक्षाचे उमेदवार कांचन कुल टक्कर देणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज सुप्रिया सुळे, सुजय-विखे पाटील, नीलेश राणे, रक्षा खडसे, विधाल पाटील यांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.