हुश्श्य! अखेर काँग्रेसला उमेदवार मिळाला; पुणे येथून मोहन जोशी निवडणुकिच्या रिंगणात

काँग्रेस पक्षाकडून ते विधानसभेवर माजी आमदारही राहिले आहेत. जोशी यांच्या उमेदवारीमुळे पुण्यात जोशी विरुद्ध बापट असा सामना रंगणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकशुक्रवारी पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रचाराबाबत रणनिती ठरविण्यात आली.

Mohan Joshi | (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Elections 2019: उमेदवार जाहीर करण्या आधीच केवळ पक्ष चिन्हावर निवडणूक प्रचार सुरु करणाऱ्या काँग्रेस (Congess) पक्षाला पुणे लोकसभा मतदार संघासाठी (Pune Lok Sabha Constituency) अखेर उमेदवार मिळाला आहे. अनेक नावांची चाचपणी केल्यानंतर अखेर काँग्रेसने माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. काल रात्री (सोमवार, 1 एप्रिल 2019) उशीरा काँग्रेसने जोशी (Mohan Joshi) यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे पुण्यात आता भाजप उमेदवार गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा सामना रंगणार आहे. अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड अशी बरीच नावे पुण्यासाठी चर्चेत होती. मात्र, अखेरच्या क्षणी जोशी यांनी बाजी मारली.

दरम्यान, पुणे मतदार संघातून निवडणुकीसाठी सुरेखा पुणेकर यांच्या नावाचीही काही काळ चर्चा रंगली होती. मात्र, सर्व नावांच्या चर्चांना पूर्णविराम देत काँग्रेसने मोहन जोशी यांना तिकीट दिले आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा उमेदवारांची 9 वी यादी सोमवारी रात्री जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. पैकी पुणे येथून मोहन जोशी तर रावेल लोकसभा मतदारसंघातून डॉ. उल्हास पाटील यांना संधी मिळाली आहे. (हेही वाचा, PM Modi in Wardha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील सभेवेळी मैदान अर्ध रिकामं; राजकीय वर्तुळात वाऱ्याची दिशा बदलल्याची चर्चा)

मोहन जोशी हे गेली 38 वर्षे काँग्रेस पक्षात कार्यकत आहेत. काँग्रेस पक्षाकडून ते विधानसभेवर माजी आमदारही राहिले आहेत. जोशी यांच्या उमेदवारीमुळे पुण्यात जोशी विरुद्ध बापट असा सामना रंगणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठकशुक्रवारी पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रचाराबाबत रणनिती ठरविण्यात आली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif