राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी सुजय विखे यांचे फोटोसेशन, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
भाजप कडून अमहमदनगर (Ahmednagar) येथून उमेदवारी देण्यात आलेल्या सुजय विखेंनी (Sujay Vikhe) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्याला निधनानंतर श्रद्धांजली वाहताना फोटोसेशन केल्याचा प्रकार घडला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) तारीख अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहचली आहे. त्यातच राजकीय पक्षाकडून त्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप कडून अमहमदनगर (Ahmednagar) येथून उमेदवारी देण्यात आलेल्या सुजय विखेंनी (Sujay Vikhe) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्याला निधनानंतर श्रद्धांजली वाहताना फोटोसेशन केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नेटकऱ्यांकडून विखे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
राहुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते शिवाजी गाडे यांचे मंगळवारी निधन झाले.त्यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुजय विखे यांनी उपस्थिती लावली. परंतु गाडे यांना पुष्पहार अर्पण करताना फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सुजय विखे यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचसोबत परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे ही नेटकऱ्यांनी विखे यांना सुनावले आहे.(हेही वाचा-सोलापूर: प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत ‘छोटा पाकिस्तान’ असा उल्लेख; कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल)
हेमंत सुपेकर यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी खालची पातळी गाठली आहे. तसेच नगरची ही संस्कृती नसल्याचे ही सुपेकर यांनी म्हटले आहे. परंतु सुजय विखे यांनी केलेल्या प्रकारामुळे आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.