Lok Sabha Election Results 2019: उर्मिला मातोंडकर पिछाडीवर गोपाळ शेट्टी 60000 हजार मतांनी आघाडीवर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी घेतली. मात्र, असे करत असताना पक्षाने त्यांना थेट उमेदवारीच दिली. राजकारणाला प्रचलित अर्थाने अनोळखी असलेल्या उर्मिला यांना ओळख बनवण्यासाठी संधीच मिळाली नाही. त्या लोकांसमोर आल्या त्या थेट उमेदवार म्हणूनच. दुसऱ्या बाजूला त्यांना उमेदवारी मिळाली ती सुद्धा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसघातून. हा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

Urmila Matondkar, Gopal Shetty | (Photo credit: archived, modified, representative image)

Lok Sabha Election Results 2019: उत्तर मुंबई मतदारसंघातून अगदी ऐनवेळी उमेदवारी जाहीर होऊनही काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)  यांनी भाजप खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांना निवडणूक प्रचारात तगडे आव्हान दिले. प्रत्यक्ष मतदमोजणीतही हे आव्हान कायम राहील अशी चर्चा असतानाच वास्तव मात्र वेगळे दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी 90947 हजांवर पोहोचले आहेत. त्यांनी उर्मला यांच्यावर जवळपास 60 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर उर्मिला मातोंडकर यांची  29383 मतांवर वाटचाल सुरु आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी घेतली. मात्र, असे करत असताना पक्षाने त्यांना थेट उमेदवारीच दिली. राजकारणाला प्रचलित अर्थाने अनोळखी असलेल्या उर्मिला यांना ओळख बनवण्यासाठी संधीच मिळाली नाही. त्या लोकांसमोर आल्या त्या थेट उमेदवार म्हणूनच. दुसऱ्या बाजूला त्यांना उमेदवारी मिळाली ती सुद्धा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसघातून. हा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. (हेही वाचा, LIVE महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: बारामती, शिरुर येथील कल राष्ट्रवादी काँग्रेससाठी दिलासादायक)

दरम्यान, हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now