Lok Sabha Election 2019: रणजितसिंग मोहिते पाटील यांची भाजपा पक्ष प्रवेशाची घोषणा; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या प्रवेश

सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ रणजितसिंह यांचा भाजपाप्रवेश हा महाआघाडीला दुसरा मोठा धक्का समजला जात आहे.

Ranjitsinh Mohite-Patil with Vijaysinh Mohite–Patil | (Photo Credits- Facebook)

रणजितसिंग मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी भाजपा पक्ष प्रवेशची घोषणा करून आज राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. माढा (Madha) येथील लोकसभा मतदार संघातून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणूक(Lok Sabha Election) लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र राष्ट्रवादीकडून (NCP) याबाबतची चिन्ह दिसत नसल्याने त्यांनी भाजपाची वाट धरली आहे. आज कार्यकत्यांसमोर भाषण करताना याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. उद्या 12.30 च्या सुमारास रणजितसिंह मोहिते पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) वरच्या गरवारे क्लबमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ रणजितसिंह यांचा भाजपा प्रवेश हा महाआघाडीला दुसरा मोठा धक्का समजला जात आहे. राष्ट्रवादीला पार्थ पवार चालतात मग रणजित दादा का नको? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनी विचारला आहे. तर रणजितसिंह यांचा भाजपा प्रवेशाला पाठिंबा असल्याची माहिती त्यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिली  आहे.  सोलापूर: राष्ट्रवादीच्या गडाला हादरा; रणजितसिंह मोहिते पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश

विजयसिंह मोहिते पाटील हे माढाचे खासदार आहेत. आगामी निवडणूकीमध्ये माढा मतदार संघातून रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाकडून निवडणूक लढतील.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; जाणून घ्या कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी