Local Co Operative Society Elections Postponed: सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

राज्यात ओबीसी आरक्षणावरुन निर्माण झालेला पेच, राज्यभर मुसळधार असलेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे.

Elections | (File Image)

राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या (Cooperative Society) निवडणुका (Cooperative society Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ओबीसी आरक्षणावरुन निर्माण झालेला पेच, राज्यभर मुसळधार असलेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पुरस्थिती या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. राज्यातील सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबर पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगोदर या निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार होते. स्थानिक राजकारणात (Local politics) या निवडणुकांना अधिक महत्त्व असते.

आगोदर जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ, दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन या या चार राज्यस्तरीय सहकारी शिखर संस्थांच्या निवडणुका पार पडणार होत्या. (हेही वाचा, Maharashtra Elections 2022: 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर)

दरम्यान, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन पार पडणार होत्या. त्यासाठी मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करणे आणि निवडणुका अधिक अचूक प्रक्रियेद्वारे पार पडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. या निवडणुकीची अद्यायावत माहिती आणि प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य यांचे https://scea.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ कार्यन्वीत करण्यात आले आहे. नागरिकांकडूनही या संकेतस्थळाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे पराधिकरणाने म्हटले आहे.