Rajmata Jijabai Jayanti 2021: राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अनिल देशमुख, उदयनराजे भोसले, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, धनंजय मुंडे आदी नेत्यांकडून ट्विटद्वारे विनम्र अभिवादन!
Rajmata Jijabai Jayanti 2021: आज राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील होते. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी दौलताबाद येथे झाला. इ.स.1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख, उदयनराजे भोसले, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी ट्विटरद्वारे विनम्र अभिवादन केलं आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अभिवादन केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना घडविणाऱ्या, स्वराज्याच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असणार्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! (Rajmata Jijabai Jayanti 2021 Wishes: राजमाता जिजाबाई जयंती निमित्त Messages, WhatsApp Status वापरत आपण देऊ शकता ऐतिहासिक स्मृतींना उजाळा)
अनिल देशमुख ट्विट -
छत्रपती उदयनराजे भोसले ट्विट -
वर्षा गायकवाड ट्विट -
रोहित पवार ट्विट -
जितेंद्र आव्हाड ट्विट -
धनंजय मुंडे ट्विट -
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाऊंनी शिवाजी महारांजांना स्वराज्याचं स्पप्न दाखवलं आणि ते सत्यात उतवण्यासाठी त्यांना प्रबळ इच्छाशक्ती व ज्ञान दिलं. जिजाऊंमुळे शिवराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी राजमातेला अभिवादन केलं आहे.