लक्ष्मणराव ढोबळे यांचा राष्ट्रवादी पक्षाला रामराम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश

जालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत ढोबळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Laxman Dhoble (Photo credits: Twitter)

निवडणूका जवळ आल्याने आता पक्षांतर्गत राजकारण आणि त्यामधून नाराज दल बदलू समोर येत आहेत. सोलापूरमध्ये (Solapur) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे (Laxaman Rao Dhoble)  यांनी भाजपामध्ये (BJP)  प्रवेश केला आहे. जालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत ढोबळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ढोबळे इच्छुक आहेत.

लक्ष्मणराव ढोबळे यांना राष्ट्रवादीमध्ये सतत डावलले जात होते. परिणामी नाराज ढोबळे यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला आहे. दरम्यानच्या काळात ढोबळे भाजपा नेत्यांच्या संपर्कामध्ये होते. मंगळवेढा आणि मोहोळहून ढोबळे विधानसभेवर निवडूनही गेले आहेत. उस्मानाबादमधूनही त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

लक्ष्मणराव ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रभावी नेत्यांपैकी एक होते. राष्ट्रवादी-काँग्रेस सत्तेत असताना त्यांना मंत्रीपदही अनुभवले. मागील निवडणुकीत ढोबळे यांना डावलून रमेश कदम यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. तिकीट न मिळाल्यानं ढोबळेंनी बंडखोरी केल्याचं म्हटलं जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif