Latur: महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दरोडा, 27 लाख रुपयांच्या रकमेसह चोरटे पसार; लातूर जिल्ह्यातील अनंतपाळ येथील घटना

दरोडेखोरांनी बँकेतील 27 लाख रुपयांची रोकड पळवली आहे. ही घटना लातूर (Latur News) जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या बँकेच्या अनंतपाळ शाखेत घडली. पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेऊन तपास सुरु केला आहे.

Robbery | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या (Maharashtra Gramin Bank) अनंतपाळ शाखेत दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बँकेतील 27 लाख रुपयांची रोकड पळवली आहे. ही घटना लातूर (Latur News) जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या बँकेच्या अनंतपाळ शाखेत घडली. पोलिसांनी घटनेची तातडीने दखल घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, घटनेचा पंचनामा करुन गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशीरपर्यंत सुरु होती. महाराष्ट्र ग्रामीण बँक कार्यालय आदल्या दिवशी कामकाज संपल्याने नियमीत वेळेनुसार बंद झाले. दुसऱ्या दिवशी बँक कर्मचाऱ्यांनी बँक उघडली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापनाने पोलिसांशी (Police Station) संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, शिरुर पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तापासात मध्यरात्री दरोडा पडल्याच पुढे आले आहे. धक्कादाय म्हणजे बँकेचे कार्यालय अनंतपाळ नगरपंचायतीच्या इमारतीमध्ये आहे. त्यामुळे मध्यवर्ती इमारतीवर दरोडा पडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाखेचे व्यवस्थापक सौरभ वाल्मीक खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दरोड्यात 27 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली आहे. (हेही वाचा, Mumbai: दहिसरच्या 'स्टेट बँक ऑफ इंडिया'वर दरोडा; गोळीबारात कर्मचाऱ्याचा मृत्यू, अडीच लाखाची रोकड लंपास)

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अनंतपाळ शाखेत परिसरातील जवळपास 14 गावांचा व्यवहार चालतो. त्यामुळे बँकेचे व्यवहार आणि उलाढालही मोठी असते. सोमवारी सकाळी 10 वाजणेच्या सुमारास बँकेचे कर्मचारी बँकेत आले असता त्यांना बँकेचा मुख्य दरवाजा तोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बँक व्यवस्थापनाने लातूर येथील रीजनल ऑफिसशी संपर्क साधून घडल्या घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या पाहणीत बँकेचा लॉकर तोडून त्यातील 27 लाख रुपयांची रोखड चोरट्यांनी पळविल्याचे पुढे आले.