Latur Accident: लातूरमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; माय- लेकाचा मृत्यू
या गाडीवर 26 वर्षीय महिला आणि तिचा लहान मुलगा प्रवास करत होते.
लातूर शहरात (Latur Accident) बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. राजीव गांधी चौकात (Rajiv Gandhi Chouk) हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला आणि तिझ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू हा झाला आहे. या घटनेने परिसराक हळहळ व्यक्त ही केली जात आहे. लातूर शहरातील औसा रोडवरील राजीव गांधी चौकात भरधाव बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. (हेही वाचा - Car Accident In Nagpur: नागपूर शहरात भरधाव कारने दोघांना दिली धडक, दोघांचा मृत्यू; आरोपी घटनास्थळावरून फरार)
सोलापूर- उमरगा लातूर ही बस (एमएच 14, बीटी 1434) ने चौकामध्ये एक्टिवा (एमएच 24 बीएम 3754) गाडीला धडक दिली. या गाडीवर 26 वर्षीय महिला आणि तिचा लहान मुलगा प्रवास करत होते. बसची धडक इतकी भीषण होती की अपघातामध्ये मायलेकाचा दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.
सध्या पोलीस या अपघातानंर घटनेचा तपास करत आहे. विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झालेली पहायला मिळाली.