Car Accident In Nagpur: नागपूर शहरात भरधाव कारने दोघांना दिली धडक, दोघांचा मृत्यू; आरोपी घटनास्थळावरून फरार

भरधाव एसयूव्ही कारने महिलेसह तरुणाला जोरदार धडक दिली आहे. कारने मोपेडला टक्कर देत दोघांना उडवलं आहे.

Car Accident In Nagpur: नागपूर शहरात भरधाव कारने दोघांना दिली धडक, दोघांचा मृत्यू; आरोपी घटनास्थळावरून फरार
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Car Accident In Nagpur:  काल मध्य रात्री शिर्डी (Shirdi) येथे खासगी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडून आला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. दरम्यान नागपुर मध्ये एका कारने (Car) महिलेसह तरुणाला धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंबाझरी परिसरात ही घटना घडली आहे.कारने मोपेडला टक्कर देत दोघांना उडवलं आहे. या घटनेत महिलेसह तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला आहे. एसयुव्ही कार चालकाकडून अपघात झाल्याचे समजले आहे.

कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. स्थानिका पोलीसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. या घटने संदर्भात आरोपीचा शोध सुरु केला आहे.  कुसुमबाई भोयर आणि पावस चौरसिया अशी कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी परिसरातल्या रामनगर चौकातील वळणावर भरधाव एसयूव्हीने महिलेसह तरुणाला धडक दिली. धडक इतक्या जोरात दिली त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकांचा वाहनावरिल नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

 अपघात झाल्यावर आरोपी घटनास्थळा वरुन फरार झाला आहे. या घटने संदर्भात पोलीसांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी इतर नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी येताच दोघांना रुग्णालयात दाखल केलं. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटने नंतर पोलिसांनी रामनगर येथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आहे. पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. रामनगर पोलीसांनी या घटनेअंतर्गत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

 

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2023 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).