Latur Crime: लातूरमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद, दोघा भावांवर जीवघेणा हल्ला, एकाचा दुदैवी मृत्यू, 1 जखमी

जिल्ह्यातील होळी या गावात हा प्रकार घडला आहे. नमस्कार का घातला या कारणामुळे हत्या करण्यात आली आहे.

Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Latur Crime: लातुर जिल्ह्यात एका क्षुल्लक कारणांवरून एकाची हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यातील होळी या गावात हा प्रकार घडला आहे. नमस्कार का घातला? या कारणामुळे हत्या करण्यात आली आहे. ही घटना इतकी भयंकर होती की, गावात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेत आहे. घटनेत हत्या झालेल्या तरुणाचा भाऊ देखील गंभीर जखमी झाला आहे.  (हेही वाचा- दवाखान्यात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; डॉक्टरावर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, नमस्कार का घातला? या कारणावरून वाद झाला होता. यावरून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. महादेव उर्फ मुन्ना केरबा यादव आणि त्यांच्या लहान भाऊ संभाजी केरबा यादव यांच्यावर गावातील चार ते पाच जणांनी हल्ला केला. सकळी यांच्यात नमस्कार का घातला या गोष्टीवरून प्रकाश यादव यांच्यासोबत वाद झाला होता. या घटनेचा राग मनात धरात रात्री दोघा भावांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी प्रकाश सोबत आणखी तीन ते चार जण होते. त्यांनी धारदार शस्त्र घेऊन दोघांवर सपासप वार  केला. मुन्ना यांच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. या घटनेत मुन्ना याचा जागीच मृत्यू झाला आणि लहान बंधू संभाजी गंभीर जखमी झाले.

या घटनेची गावकऱ्यांना माहिती मिळताच, जखमीला रुग्णालयात दाखल केले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. औसा पोलिस ठाण्यातील पथक घटनास्थळी आले. रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मुन्ना याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील चौकशी सुरु केली आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना यात राजकारणाचा हात असल्याचा संशय आला आहे.