Mumbai Shocker: दवाखान्यात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; डॉक्टरावर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मुंबई उपनगरातील मालाड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Mumbai Shocker: दवाखान्यात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; डॉक्टरावर बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai Shocker: मुंबई उपनगरातील मालाड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मुंबई हादरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टराविरुध्द बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली आहे. मालाड पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर रोजी काम करत असलेल्या क्लिनिकमध्येच मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती मिळताच, मालाड येथील कुरार पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मुलीचा लटकलेला मृतदेह खाली उरतवला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागरी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुलीने डॉक्टरांच्या अपमानास्पद वागणुकीबद्दल आईकडे तक्रार केली होती त्यामुळे मुलीने आत्महत्या केली नाही, असा दावा मृत मुलीच्या आईने केली आहे.

मृत मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध आयपीसी कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 376 (बलात्कारासाठी शिक्षा) आणि बाल न्याय कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2024 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).