लातूर भीषण अपघात : कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जण ठार, सुदैवाने वाचले चिमुकलीचे प्राण

लातूरच्या लग्नसमारंभातून परत येत असणाऱ्या वऱ्हाड्यांच्या गाडीची भरधाव टेम्पोशी धडक होऊन भीषण अपघात झालाआहे, या दुर्दैवी घटनेत सोनकांबळे कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत

Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

लातूर (Latur) मध्ये एका लग्नातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने असा काही घाला घातला की एकाच वेळी कुटुंबातले पाच जण जागच्या जागी ठार झाले. मात्र या कारच्या धडकेत (Accident) खिडकीतून बाहेर फेकल्या गेलेल्या 'प्राची अरविंद सोनकांबळे' या एका वर्षाच्या चिमुकलीचा प्राण वाचल्याचे समजत आहे.लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि लग्नाहून परतणाऱ्या अ‍ॅपे मॅजिकची समोरासमोर टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू होऊन सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

धामणगाव येथील सोनकांबळे परिवार विळेगाव, अहमदपूर येथून लग्न आटोपून परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोसोबत धडक झाली. ही धडकी इतक्या विलक्षण वेगात झाल्याने क्षणाधार्त या जीपमधील ज्ञानोबा सोनकांबळे (40), अरविंद सोनकांबळे (30), पुष्पा सोनकांबळे (45), कांताबाई सोनकांबळे (55), छकुली सोनकांबळे (6) पाच जणांचा मृत्यू झाला. यासोबतच आरुशी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनिता सोनकांबळे, रितेष सोनकांबळे, प्राचीन सोनकांबळे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  बीड: ट्रक-कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच जखमींना जवळच्या जळकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, येथे प्राथमिक उपचार झाल्यावर त्यांना सकाळी उदगीरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताने सोनकांबळे कुटुंबावर दुःखाचा पर्वतच कोसळला असून एका वर्षाच्या प्राचीचे नशीब बलवत्तर असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये ऐकू येतेय.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif