बीड: ट्रक-कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
अहमदनगर जामखेड रोडवर ट्रक-इर्टिगा कारच्या भीषण अपघातात कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर जामखेड रोडवर (Ahmednagar Jamkhed Road) ट्रक-इर्टिगा कारच्या भीषण अपघातात कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. नागेश चमकुरे (चालक), योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे, अनिकेत चमकुरे अशी मृतांची नावे आहेत.
भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि इर्टीका कारची समोरासमोर आल्याने टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पोखरी फाट्याजवळ पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांनी आपला जीव गमावला.
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2019 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

