Lalbaugcha Raja 2023 Donations: तीन किलो सोने, 64 किलो चांदी, 5 कोटींहून अधिक किमतीची रोकड; यंदा लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान

पैशांची मोजणी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात. एकूण रोख रक्कम 8 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

Lalbaugcha Raja 2023 (संग्रहित संपादित प्रतिमा)

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja 2023) हा मुंबईमधील एक प्रतिष्ठित गणपती समजला जातो. या गणपतीची ख्याती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आहेत. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे लालबागच्या राजाला तितक्याच मोठ्या प्रमाणात दानही दिले जाते. नुकतेच यंदा लालबागच्या राजाला मिळालेल्या गोष्टींचा लिलाव करण्यात आला. यावर्षी बाप्पाला एकूण साडेतीन किलो सोन्याचे दान प्राप्त झाले आहे. याची किंमत सुमारे दोन कोटी दहा लाख रुपये आहे. यासह सुमारे 45 लाख रुपयांची 64 किलो चांदीही भाविकांनी दान केली आहे. इतकेच नाही तर मंडळाला रोख रकमेच्या स्वरूपात 5 कोटी पेक्षा जास्त रुपये प्राप्त झाले आहेत.

मोजणीच्या 8 दिवसांत आतापर्यंत 5 कोटी 16 लाख रुपये मोजले गेले आहेत. पैशांची मोजणी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात. एकूण रोख रक्कम 8 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

काही भक्तांनी बाप्पाला 2 इलेक्ट्रिक स्कूटर देखील अर्पण केल्या आहेत. ज्याची किंमत सुमारे 3.5 लाख रुपये आहे. लिलावात सर्वप्रथम चांदीची मूर्ती ठेवण्यात आली होती, जी मेहुल नावाच्या भक्ताने खरेदी केली होती. सोन्या-चांदीशिवाय अनेक वस्तूही बाप्पाला अर्पण करण्यात आल्या. येथे सुमारे एक किलो सोन्याचा हार, चांदीची गदा, सोन्या-चांदीचे मोदक, चांदीचा मूषक राजा, चांदीचे नारळ, चांदीचे ताट, विविध पूजा साहित्य, चांदीचा कलश, सोन्या-चांदीची नारायण नाणी, सोन्याचा गुलाबाचा हार, चांदीच्या माळा आणि चांदीचे छत्र बाप्पाला अर्पण करण्यात आले. (हेही वाचा: राज्यातील गड-किल्ल्यांची पावित्र्य अबाधित राहणार; स्वच्छता व संवर्धनासाठी सरकार देणार तीन टक्के निधी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

नवसाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाला आपल्या भक्तांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा रविवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी लिलाव केला. लालबाग ट्रस्टचे सचिव सुनील साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी केला जाणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांना त्याचा लाभ घेता येईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif