Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेवरुन शिवसेना - एनसीपीमध्ये श्रेयवादाची लढाई; पाहा राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा Video
यानिमित्ताने राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.
सध्या राज्य सरकार आपल्या माझी लाडकी बहीण योजनेवरून नागरिकांकडे मत मागात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका भरसभेत उपस्थित महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का ? असा प्रश्न विचारला होता. सध्या महायुती सरकार या योजनेवरुन लोकांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात लाडकी बहीण योजनेचे मेळावे घेत आहेत. यानिमित्ताने राज्यातील महिलांशी संपर्क साधत आहेत. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. (हेही वाचा - NCP Candidates List For Jammu Kashmir Assembly Elections: अजित पवारांनी जम्मू-काश्मीर निवडणूकीसाठी उभे केले उमेदवार; भाजप चिंतेत)
पाहा राष्ट्रवादी काँग्रेसने तयार केलेली नवी जाहिरात
या जाहिरातीमुळे महायुतीत नाराजी पहायला मिळत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या जाहिरातीच्या नावातून मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी या जाहिरातीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये वापरण्यात आले आहेत. यावर नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे”, अशी एक जाहिरात समाजमध्यमांवर व्हायरल झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही योजना मांडली असल्याचे राष्ट्रवादीी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.