NCP Candidates List For Jammu Kashmir Assembly Elections: अजित पवारांनी जम्मू-काश्मीर निवडणूकीसाठी उभे केले उमेदवार; भाजप चिंतेत
अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 16 उमेदवार उभे केले आहेत.
अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने 16 उमेदवार उभे केले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपपासून वेगळे होऊन विधानसभा निवडणूक लढवत आहे. मात्र, महाराष्ट्रात दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. याआधी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता पक्षाने च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली होती. (हेही वाचा - Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका दिवाळी नंतर? CM Shinde यांनी दिले संकेत)
राष्ट्रवादीने जम्मू-काश्मीरमधील गांदरबलमधून वकिल मोहम्मद अल्ताफ, हजरतबलमधून हनीफ खान, खानयारमधून निसार अहमद, हब्बकन दाईमधून जाहिद बशीर, लाल चौकातून समीर अहमद, चेनापोरामधून हाजी परवेज, जदीबलमधून रियाझ अहमद, इदगाहमधून कैसर अहमद यांना उमेदवारी दिली आहे. सेंट्रल नूर मोहम्मद शेख, बडगाममधून संजय कौल, बिरवाहमधून नझीर अहमद, खान साहिबमधून शहनाज हुसैन, चरार-ए-शरीफमधून अब्दुल सलाम, चधुरामधून तारिक अहमद, रियासीमधून ताराचंद आणि माता वेष्णोदेवीमधून अशोक कुमार यांना तिकीट देण्यात आले आहे.
याआधी, पहिल्या यादीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जम्मू-काश्मीरमधील त्राल, पुलवामा आणि राजपुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली होती. पक्षाने त्रालमधून मोहम्मद युसूफ हझम यांना उमेदवारी दिली होती. पुलवामा येथून इश्तियाक अहमद शेख यांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय राजपुरामधून अरुण कुमार रैनाच्या नावाची घोषणा करण्यात आली. जम्मू-काश्मीरमध्ये एनडीएचा भाग असलेल्या राष्ट्रवादीने भाजपपासून वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2024 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

