Kolhapur Shocker: रेल्वे रुळावरून जाताना कोयना एक्स्प्रेसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयना एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या दोन महिला आणि एका चिमुकल्या मुलीचा समावेश आहे.

Kolhapur Shocker: रेल्वे रुळावरून जाताना कोयना एक्स्प्रेसने चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू
koyana Express PC INSTA

Kolhapur Shocker: कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयना एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या दोन महिला आणि एका चिमुकल्या मुलीचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी उशिरा रात्री घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांची चौकशी चालू झाली आहे. ट्रेन मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. (हेही वाचा- आग लागल्याची अफवा पसरवली, धावत्या ट्रेनमधून प्रवाशांच्या उड्या, पाच जण दगावले)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह एक चिमुकली मुलगी रेल्वेच्या पटरीवरून जात होते. त्यावेळी मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनने तिघांना चिरडले. दुर्दैवाने तिघांचा जागीच मृत्यू झाला. महिला कुठे जात होत्या हे अद्याप समोर आले नाही. रुळावरून जात असताना ही घटना घडली असा संशय पोलिसांना कडून वर्तवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SaamTvNews (@saamtvnews)

महिलांनी आत्महत्या केली आहे का? असा संभ्रम पोलिसांच्या समोर आला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शाहपूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. महिलांची ओळख अद्याप पटली नाही. पोलिसांकडून तपासणी सुरु झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2024 11:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).