Koregaon Bhima Shaurya Din 2020: कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शक सूचना जाहीर, 'या' नियमांचे पालन करावे लागणार
राज्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी पुढील वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी अभिवादन कार्यक्रम प्रत्येक वर्षाला आयोजित केला जातो
Koregaon Bhima Shaurya Din 2020: राज्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी पुढील वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी अभिवादन कार्यक्रम प्रत्येक वर्षाला आयोजित केला जातो. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यसरकारने कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. कोरेगाभ भीमा शौर्यदिनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती पाहता नागरिकांना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे.(Coronavirus Vaccination: मुंबईमध्ये कोरोना व्हायरस लसीकरणासाठी BMC ची जोरदार तयारी; कर्मचार्यांना 7 जानेवारीपर्यंत प्रशिक्षण, 80 हजार Health Workers ची नोंदणी)
यंदाच्या वर्षातील सर्व धर्मियांचे सण उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे असे आवाहन राज्य सरकारकडून नागरिकांना करण्यात आले होते. तसेच प्रत्येक सणाच्या वेळी गाईडलाइन्स ही स्थानिक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनानिमित्त ही गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत.(No Midnight Mass in Mumbai: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केली जाणार नाही; नागरिकांना ख्रिसमस आणि नवीन वर्ष रात्री 10 च्या अगोदर साजरे करावे लागणार)
-कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त जाहीर सभा, खाद्यपदार्थांसह पुस्तक स्टॉल लावण्यास परवनागी नसणार आहे.
-अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दूरदर्शन आणि अन्य समाज माध्यमांच्या द्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
-नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीनेच विजय स्तंभाला अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- मार्गदर्शक नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असणार आहे.
तर ब्रिटन मध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. याच कारणास्तव राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)