मुंबई-सिंधुदुर्ग प्रवास 3 तासांत? महाराष्ट्र सरकार 70 हजार कोटीच्या कोकण एक्सप्रेस च्या तयारीत

Road (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मुंबई -पुणे च्या धर्तीवर आता मुंबई- सिंधुदुर्ग एक्स्प्रेस वे (Mumbai-Sindhudurg) बांधण्याच्या तयारीमध्ये आहे. यासाठी पीडब्ल्यू डी खात्याची लगबग सुरू झाली आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी त्यासाठी आराखडा तयार केला आहे. असे मीडीया रिपोर्ट्स समोर आले आहेत. मुंबई -सिंधुदुर्ग हा एक्सप्रेस वे रत्नागिरी आणि रायगड यांना जोडणारा आहे. 400 किमी लांबीचा हा प्रस्तावित महामार्ग अंदाजे 70 हजार कोटींचा आहे. कोकणात सध्या मुंबई हून सिंधुदुर्गात जाण्यासाठी रस्तेमार्गे 8 तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार, पीडब्युडीच्या वेबसाईट वर 6 सप्टेंबरला दिलेल्यामाहितीनुसार त्यांनी MSRDC ला मागील वर्षी त्याचं प्रपोजल तयार करण्यास सांगितलं होतं. 25 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसह हाय लेव्हल इंफ्रास्टक्चर कमिटीने त्याला परवानगी दिली आहे. या कमिटीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

दरम्यान मुंबई - सिंधुदुर्ग एक्सप्रेस वेला ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे असं नाव असेल. त्यासाठी 70,000 कोटींचा खर्च आहे. याचा सविस्तर रिपोर्ट पुढील 2 वर्षांत येण्याची शक्यता आहे. तर हा एक्सप्रेस वे होण्यासाठी त्याच्यापुढे 4 वर्ष लागू शकतात. याकरिता 4 हजार हेक्टर जमिनीची आवश्यक्यता असल्याने एका अधिकार्‍याने TOI ला सांगितले आहे. हेदेखील वाचा- चिपी विमानतळाबद्दल '८' खास इंटरेस्टिंग गोष्टी.

महाराष्ट्रात सध्या अशाच प्रकारे मुंबई-नागपूर ला जोडणारा समृद्धी महामार्ग देखील आहे. त्याचं काम देखील जोमात सुरू आहे. कोकण हा मुंबई शेजारचा जिल्हा आहे. कोकणातून अनेक लोकं नोकरी धंद्याच्या शोधात मुंबईला आले आहेत. सध्या पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाकडे पाहिलं जात आहे. अनेकांची निळ्याशार समुद्राला न्याहाळण्यासाठी सध्या कोकणाला पसंती वाढली आहे.