Chandrakant Patil on Bunty Patil: चंद्रकांत पाटील यांचे विचित्र वक्तव्य, म्हणाले 'बंटी पाटील माणसं खाणारा माणूस'

'बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे.

Chandrakant Patil | (Photo Credit: Twitter)

कोल्हापूर (Kolhapur) येथे बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांनी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील (Satej alias Bunty Patil) यांच्याबद्दल काहीसे विचित्रच वक्तव्य केले आहे. 'बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे' असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे. चंद्रकांत पाटील यांना या विधानातून काय सूचवायचे होते हे समजू शकले नाही. परंतू, त्यांच्या विधानामुळे अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार दिला आहे. या वळी चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, सतेज उर्फ बंटी पाटील यांनीही चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच हे लोक अशी विधाने करत आहेत. शिवसेना-भाजप युती असतान जाणीवपूर्वक अपक्ष उमेदवारांना अर्ज भरायला लावून शिवसेना उमेदवारांचा पराभव करण्याचा प्रयत्न भाजप करत असे. कोल्हापूरातील संबंध शिवसैनिकांना यांचे उद्योग माहिती झाले आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत हे शिवसैनिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील असे बंटी पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Chandrapur: काँग्रेसचा अंतर्गत वाद ठाकरे सरकारच्या डोक्याला ताप, Congress खासदाराकडून CBI चौकशीची मागणी;अमित शाह यांच्याकडूनही अश्वासन)

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव हे निवडूण आले होते. मात्र, कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री यांना मैदानात उतरवले आहे. खरेतर हा मतदारसंघ शिवसेनेचा म्हणून ओळखला जातो. परंतू, 2019 मध्ये काँग्रेस उमेदवार निवडून आल्याने आघाडीधर्म पाळत शिवसेनेने ही जागा काँग्रेसला सोडली आहे.