रायगड, कोल्हापूर,सातारा, सांगली मध्ये पुढील 3 दिवस अतिवृष्टीचे; पुणे शहरात 137% पाऊस

त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Kolhapur Flood (Photo Credits: Twitter/ DDI Kolhapur)

कोल्हापूर, सांगली शहराला मागे काही दिवसांपासून जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर आता कृष्णा नदी, राधानगरी धरणातील पाण्याने धोक्याची पातळी पार केल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक बंधारे, पूल पाण्याखाली गेल्याने स्थिती अधिकच बिकट झाली आहे. आज (7 ऑगस्ट) विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस (8,9 आणि 10 ऑगस्ट) अतिवृष्टीचे राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे स्वयंचलित असल्याने पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा निचरा होणार नाही आणि परिस्थिती अधिक धोकादायक बनू शकते.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूराला अजून काही दिवस अतिवृष्टीचा धोका आहे. सांगलीतील 18 गावांचा संपर्क तुटला आहे. सातार्‍यातील 6 गावांचा संपर्क तुटला असून शासनाने आत्तापर्यंत 6200 लोकांचे पुनर्वसन केले आहे. तर पुण्यामध्येही पावासाची स्थिती बिकट झाली आहे. पुण्यात 137% पाऊस झाला आहे. 58 पैकी 30 गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. Kolhapur Flood: कोल्हापूर मध्ये पावसाचं थैमान; तुझ्यात जीव रंगला मालिका, अश्रूंची झाली फुले नाटकाचा दौरा रद्द

के एस होसाळीकर ट्विट

के एस होसाळीकर ट्विट

मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद

कोल्हापूर, सांगली शहराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आता पुरात अडकलेल्यांची सुटका एअरलिफ्टच्या सहाय्याने करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. लष्कर, नौसेना मदत करणार आहे. त्यासाठी हेलिकॉप्टर, पाणबुडी सज्ज ठेवण्यात आली आहे.