कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरामधील गरूड मंडपातील खाजगी अभिषेक बंद

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आता केवळ देवस्थान समितीचे पुजारी आणि पारंपारिक पुजार्‍यांना अभिषेक करण्याची जबाबदारी दिली आहे.

कोल्हापूर अंबाबाई देवी (फोटो सौजन्य- फेसबुक)

महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपातील खाजगी अभिषेक आता बंद करण्यात आले आहेत. अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन होणार्‍या लूटमारीवर आता लगाम बसणार आहे. महालक्ष्मी मंदिरामध्ये आता केवळ देवस्थान समिती आणि पुजार्‍यांकडून अभिषेक होणार आहे.

करवीरवासीनी महालक्ष्मी मंदिरात खाजगी पुजारी गरूड मंडपात भाविकांकडून पैसे घेऊन अभिषेक करत होते. या प्रकाराला देवस्थान समितीची परवानगी नसूनही खाजगी पुजारी अशाप्रकारे अभिषेक करत होते. मात्र आता या प्रकारावर आता मंदिर प्रशासनाने कठोर पावलं उचलत केवळ देवस्थान समितीचे पुजारी आणि पारंपारिक पुजार्‍यांना अभिषेक करण्याची जबाबदारी दिली आहे.

महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक नियमित मोठ्या संख्येने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येतात. देवस्थान समितीकडून 250 ते 800 रूपयांपर्यंतचे अभिषेक होतात.