कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिरातील सोन्या- चांदीचे मूल्यांकन पूर्ण; अंबाबाईच्या सोन्यात वर्षभरात वाढ तर चांदी घटली

2018-19 या वर्षात महालक्ष्मी देवीच्या खजिन्यात 1 कोटी 9 लाख 75 हजार रूपयांचे दागिने आले आहेत. तर उत्पन्नात 1 कोटी 56 लाख रूपयांची वाढ झाली आहे.

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर(Photo credits: Kolhapur Tourism)

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील (Mahalaxmi Mandir)  यंदाचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाचा कार्यक्रम पार पडला आहे. 2018-19 या वर्षात देवीच्या खजिन्यात 1 कोटी 9 लाख 75 हजार रूपयांचे दागिने आले आहेत. तर उत्पन्नात 1 कोटी 56 लाख रूपयांची वाढ झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरामधील गरूड मंडपातील खाजगी अभिषेक बंद

करवीर निवासिनी अंबाबाईच्या सोन्या -चांदीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाला 17 जून 2019 ला सुरूवात झाली. हे मूल्यांकन मुंबई सरकारी मूल्यांकनकार पुरूषोत्तम काळे यांच्यासह विशेष सराफांकडून करण्यात आलं. यंदा सोन्यामध्ये 800 ग्रॅम वाढ झाली असून चांदी घटली आहे.

करवीर निवासीनीप्रमाणे ज्योतिबाच्या दागिन्यांचे आणि उत्पादनाचेही मूल्यांकन करण्यात आलं आहे. यामध्ये सोन्याचे मूल्यांकन 5 लाख पन्नास हजार तर चांदीचे मूल्यांकन 62,312 रूपये इतके झाले आहे.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)

लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)

Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय

India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement