Kolhapur: इचलकरंजी येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर प्राणघातक हल्ला
कोल्हापूरच्या (Kolhapur) इचलकरंजी (Ichalkaranji) येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे (Neha Hukkire) यांचे पती विनायक हुक्किरे (Vinayak Hukkire) प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कोल्हापूरच्या (Kolhapur) इचलकरंजी (Ichalkaranji) येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे (Neha Hukkire) यांचे पती विनायक हुक्किरे (Vinayak Hukkire) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात विनायक गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर सांगली (Sangli) येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विनायक हुक्किरे एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
बसवराज महादेव तेली उर्फ कानापत्रावर, अशोक तमन्ना तेली, सुभाष तमन्ना तेली असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनायक यांचा जिमचा व्यवसाय आहे. विनायक हे इचलकरंजी-कोल्हापूर रोडवर कबनूर परिसरात असणाऱ्या हॉटेल रविराज येथे जेवायला गेले होते. त्यावेळी बसवराज, अशोक आणि सुभाष या तिघांनी त्यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला. एकाच वेळी तिघा-चौघांनी त्यांच्यावर वार केल्याने काही वार त्यांच्या वर्मी लागले. त्यामुळे ते जागीच कोसळले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढल्यानंतर विनायकला हॉटेल मालकाने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथून विनायकला सांगली सिव्हिल रुग्णालयमध्ये हलविण्यात आले असून तो उपचाराला प्रतिसाद देत आहे. हे देखील वाचा- Solapur: लग्नाच्या अवघ्या 8 महिन्यात प्रेयसीसाठी गर्भवती पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक आणि आरोपींमध्ये गेल्या आठवड्यात वाद झाला होता. या वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे हे करीत आहेत, अशी महिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे.