Mahesh Manjrekar यांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्घटना; तरूण कोसळला 100 फूट खोल दरीत

सेटवर घोड्यांना सांभाळण्याचं काम करणारा 19 वर्षीय तरूण नागेश दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

panhala | Wiki Commons

कोल्हापूर (Kolhapur)  मध्ये पन्हाळगडावर 'वेडात मराठी वीर जोडले सात' (Vedat Marathe Veer Daudle Saat) या महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  दिग्दर्शित सिनेमाच्या शूटिंग दरम्यान शनिवार (18 मार्च) च्या रात्री एक दुर्घटना घडली आहे. 19 वर्षीय तरूण 100 फूट खोल दरीत कोसळला आहे. यामध्ये जबर जखमी झाला असून खाजगी हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नागेश खोबरे असं या तरूणाचं नाव आहे

कोल्हापूरात पन्हाळगडावरील सज्जा कोटी वरील तटबंदीवर मागील काही दिवस महेश मांजरेकर यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या शूटिंगसाठी काही घोडे आणण्यात आले होते. त्या घोड्यांना सांभाळण्याचं काम हा 19 वर्षीय तरूण नागेश करत होता. काल रात्री पावणे नऊ च्या सुमारास मोबाईल फोन वर बोलत बोलत जात असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला.

नागेश कोसळल्याचं समजताच सेटवर उपस्थित लोकांनी धावाधाव केली. तातडीने दोर खाली सोडण्यात आले. नागेशला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलं. त्याच्या छातीला, डोक्याला इजा झाली आहे. त्याच्यावर कोल्हापूर मध्येच खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

'वेडात मराठी वीर जोडले सात' या सिनेमाच्या घोषणेपासून अनेक घटनांमुळे हा सिनेमा चर्चेत आहे. सुरूवातीला या सिनेमातील काही मुख्य पात्रांच्या लूक वरून वाद रंगला होता. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी दाखवलेल्या शौर्यावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर  रीलीज होण्याची शक्यता आहे.