Honor Killing at Chopda: जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस; अल्पवयीने भावानेचं केली प्रेमी युगलांची हत्या

प्रेमी युगलांना संपवल्यानंतर आरोपी पिस्तूलासह पोलीस ठाण्यात हजर झाला.

Image used for represenational purpose (File Photo)

Honor Killing at Chopda: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. तरुणाची गोळी मारुन तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तरुणीच्या अल्पवयीन भावाने दोघांची हत्या केली. प्रेमी युगलांना संपवल्यानंतर आरोपी पिस्तूलासह पोलीस ठाण्यात हजर झाला.

प्राप्त माहितीनुसार, चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांची हत्या करण्यात आली. तरुणाची गोळी मारून तर तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली. चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्तुल घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. आरोपीने प्रेमी युगलांचा खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी चोपडा शहराजवळील जुना वराड रोड शिवारात पाहणी केली. यावेळी त्यांना नाल्यात दोघांचे मृतदेह सापडले. (हेही वाचा - Ashish Shelar On Shivsena: शिवसेनेने मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराला तडीपार करण्याचं काम आम्ही करू; आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका)

आरोपीने प्रेमी युगलांच्या खूनाची कबुली दिली आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच आणखी दोन आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.