IPL Auction 2025 Live

Kharif Crop Season 2020: शेतकऱ्यांनो लाभ घ्या! खते, बी-बियाणे बांधावर पुरविण्यासाठी 47 हजार 89 शेतकरी गट तयार, सरकारने कापूस बियाणे पाकिटेही बांधावर पोहोचविली

तर 9 लाख क्विंटल खरेदी बाकी आहे. 2 लाख शेतकऱ्यांकडून 18.81 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

Fertilizers And Seeds | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Kharif Season 2020: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर खते, बी-बियाणे पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे 47 हजार 89 शेतकरी गट तयार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाने (DGIPR) दिली आहे. आतापर्यंत तब्बल 1 लाख 55 हजार 755 मेट्रिक टन खतं तर 86 हजार 126 मेट्रिक टन बियाणे, सुमारे 1 लाख 80 हजार 481 कापूस बियाणे पाकिटे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. त्याचा एकूण 5 लाख 27 हजार 483 शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने म्हटले आहे.

राज्यात सुमारे 381 लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी झाली आहे. तर 9 लाख क्विंटल खरेदी बाकी आहे. 2 लाख शेतकऱ्यांकडून 18.81 लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. तसेच, 822 कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध आहेत. 18.90 लाख क्विंटल चणा खरेदीसाठी 15 जुलै पर्यंत मुदतवाढ मागितली आहे. त्याचेही चुकारे लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे. (हेही वाचा, Kharif Crop Season 2020: महाराष्ट्राने मागितले त्यापेक्षा केंद्राने कमीच दिले, केवळ 40 लाख मेट्रिक टन खतास मंजूरी)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीद्वारे कृषी खरीप हंगामा कामांचा आढावा घेतला. या बैठकी नंतर राज्याच्या माहिती जनसंपर्क विभागाने विविध आकडेवारी जाही केली. या बैठकीस कृषी मंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता, कृषी सचिव एकनाथ डवले, मुख्य सचिव सहकार आभा शुक्ला, मुख्य सचिव पद्ुम व पणन अनुप कुमार, अन्न व नागरी पुरवठा संजय सचिव संजय खंदारे, कापूस उत्पादक महासंघ व्यवस्थापकीय संचालकनवीन सोना, कृषि आयुक्त सुहास दिवसे, महाबीज व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित होते.