Khalapur Irshalwadi Landslide Compensation: खालापूर इर्शाळवाडी दुर्घटना, 'मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार'

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.

Khalapur Irshalwadi Landslide | Photo credit: ANI)

Irshalwadi Rescue Operation: रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने जवळपास 100 गावकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एनडीआरएफचे एक पथकही मदत आणि बचावासाठी पोहोचले आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणाने मदत आणि बचाव कार्यात मोठेच अडथळे येत आहेत. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार (Khalapur Irshalwadi Landslide Compensation) केले जातील अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, दादा भूसे, उदय सामंत आणि गिरीश महाजन हे मंत्रीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

राज्य सरकारने खालापूर दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष उभारला आहे. शिवाय हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. नागरिकांनी आपल्या आप्तेष्टांची माहिती आणि इतर चौकशीसाठी 8108195554 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहतीनुसार मृतांमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झालेल्या एका जवानाचाही समावेश आहे. अनेक गावकऱ्यांना सुरक्षीत ठिकाणी दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्याप किती लोक अडकले आहेत याबाबत कोणतीही माहिती तपशीलाने उपलब्ध नाही. पावसाचा जोर कमी आल्यावर मदत कार्यास जसजसा वेग आल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची निश्चीत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यात पाठिमागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने या आधीच मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत रेड अलर्टही जारी केला होता. दरम्यान, रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक मोठा आवाज झाला आणि दरड कोसळली. ज्यामुळे उंच डोंगराचा काही भाग गाववर कोसळला. घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम सकाळी 6.30 वाजात घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मुसळधार पावसामुळे कामावर नियंत्रण आले. दरम्यान, नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षीत ठिकाणी दाखल करण्याचाही प्रयत्न झाला मात्र हवामानामुळे तेही शक्य झाले नाही.