Khadakwasala Dam Accident: खडकवासला धरणात कार कोसळली; चौघांना वाचवण्यात यश, मुलीचा बुडून मृत्यू

तर कारमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. स्थानिक आणि पोलीसांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य करण्यात आले.

Accident (PC - File Photo)

पुणे जिल्ह्यातून (Pune District) एक दुर्देवी घटना समोर आली आहे. पानशेत (Panshet) रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या ठिकाणी भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या (Khadakwasala Dam) पाण्यात कोसळली. या दुर्घटनेत एका मुलीचा बुडून मृत्यू झाला. तर कारमधील चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वेल्हे पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. मात्र, मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.   (हेही वाचा - BARC Scientist Suicide: 'सॉरी बेटा' म्हणत 'बीएआरसी'मधील शास्त्रज्ञाची मुंबई येथे आत्महत्या)

पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. सायंकाळची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ होती, तसेच आजूबाजूला स्थानिक नागरिकही होते. यामुळे अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले. नागरिकांनी पाण्यात उड्या घेऊन कारमधील चार ते पाच व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र, दुर्देवाने कारमधील एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दरम्यान घटनेच्या ठिकाणी वेल्हे पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी मुलीला उपचारासाठी रु्ग्णालयात पाठवले पंरतू डॉक्टरांनी मुलीला मृत घोषीत केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif