Jitendra Awhad Controversy: जितेंद्र आव्हाड वादात केतकी चितळेची उडी, ठाणे पोलिसांना पत्र लिहत केली विशेष मागणी

जितेंद्र आव्हाडां विरोधात विनयभंगाचं कलम लावण्यातं यावं अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळेनी केली आहे.

अभिनेत्री केतकी चितळे (Actress Kitki Chtale) आणि वाद ह्याचं नातं काही नवं नाही. पण ज्या प्रकरणात केतकीचा काहीही संबंध नाही अशा वादात आता केतकीने पुन्हा एकदा उडी घेतली आहे. राज्यभरात पुन्हा एकदा हर हर महादेव (Har Har Mahadev) सिनेमाच्या वादातून वातावरण तापलं आहे. राष्ट्रावादीचे महत्वाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हर हर महादेव सिनेमाचा शो सुरु असताना जितेंद्र आव्हाडांनी शो बंद करत सिनेमा हॉलवर (Cinema Hall) थेट हल्ला चढवला. तरी दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मराठी रसिकांना मारहाण करण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे. याचं प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) ताब्यात घेण्यात आले आहे. तरी या प्रकरणात आता मराठी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) उडी घेतली आहे.

 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, त्यांच्यावर जी कलमं लावण्यात आली आहेत ती लगेच जामीन मिळतील असं केतकी चितळेचं (Ketaki Chitale) मत आहे. तरी  या कलमांध्ये विनयभंगाचं कलम लावण्यात यावं कारण चित्रपटगृहात ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्यांच्या पत्नीसोबत जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केलं. त्यामुळे आव्हाडांविरोधात विनयभंगाचं कलम लावण्यातं यावं अशी मागणी अभिनेत्री केतकी चितळेनी (Ketaki Chitale) केली आहे. (हे ही वाचा:- Sanjay Raut Bail: मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीला संजय राऊतांच्या जामीन विरुध्द याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी)

 

तरी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर (Jitendra Awhad) राष्ट्रवादीच्या (NCP) नेतेसह कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. पण केतकी चितळेने (Ketaki Chitale) वादात घेतलेल्या या उडीनंतर वातावरण आणखीचं चिघळण्याची शक्यता आहे. हर हर महादेव (Har Har Mahadev) सिनेमातील अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी आतापर्यत यावर कुठलीही प्रतिक्रया दिलेली नाही. तरी केतकीच्या या मागणीनंतर ठाणे पोलिस काय प्रतिक्रीया देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.