Sadabhavu Khot On Ketaki Chitale: सदाभाऊ खोतकडून केतकी चितळेच समर्थन, मला तिचा अभिमानच वाटतो

सदाभाऊ खोत म्हणाले केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचे समर्थन केले आहे सदाभाऊ खोत हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते.

Sadabhau Khot (Photo Credit: Facebook)

केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने शुक्रवारी फेसबुकवर (Facebook) शेअर केलेल्या कवितेवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharadh Pawar) यांच्यावर टीका केली आहे. या टीकेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून (NCP) केतकी चितळे विरोधात चांगलाच जोर पाहायला मिळाला. केतकी चितळेला 18 तारखेपर्यत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच केतकी चितळे हिच्या वादग्रस्त विधानानंतर आमदार सदाभाऊ खोत (Sadabhavu Khot) यांनी केतकीचे समर्थन केले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचे समर्थन केले आहे सदाभाऊ खोत हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या वर वादग्रस्त पोस्ट केली होती. तिचे समर्थन करत केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. तसेच केतकी चितळेच्या विधानाचे नाही तर तिने न्यायालयात कोणत्याही वकिलाची मदत न घेता स्वतः आपली बाजू मांडल्याचे आपणांस कौतुक वाटले आणि तिचा अभिमानही वाटला, असा दावा केला.

केतकी चितळेवर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन मुंबईत आणि एक अकोल्यात आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी 29 वर्षीय अभिनेत्री केतकी चितळेवर ठाणे, पुणे आणि धुळे जिल्ह्यात ऑनलाइन पोस्ट प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, “मुंबईतील गोरेगाव आणि भोईवाडा पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले.” (हे देखील वाचा: Pune: 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात Raj Thackeray यांच्या सभेचे आयोजन; MNS नेते साईनाथ बाबर यांचे परवानगीसाठी पोलिसांना पत्र)
भोईवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष वकिल प्रशांत शंकर दुते यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी, अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी कल्पना गवारगुरु यांनी तक्रार केल्यानंतर खदान पोलीस ठाण्यात चितळे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.