Ketaki Chitale Derogatory Post Case: केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ; वारकर्‍यांच्या भावना दुखावल्या प्रकरणी देहू संस्थानची अभिनेत्री विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे शब्दांचा वापर करून वादग्रस्त लिखाण केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देहू संस्थाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना केलं आहे.

Ketaki Chitale (Photo Credit: Twitter)

एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यावरून अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitle) सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे. आता केतकीच्या अडचणींमध्ये अजून वाढ झाली आहे. केतकीच्या आक्षेपार्ह ट्वीट मध्ये 'तुका' हा शब्द आहे. यावरून देहू संस्थानकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. वारकरी संप्रदयाच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी त्यांनी केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत एक पत्र पोलिसांना सादर केले आहे. तुका म्हणे ही संत तुकारामांची नाममुद्रा आहे. त्यांच्या अभंगाची ती स्वाक्षरी आहे. असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं होत.

संत तुकाराम महाराज यांच्या तुका म्हणे शब्दांचा वापर करून वादग्रस्त लिखाण केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी देहू संस्थाने पिंपरी-चिंचवड पोलिसांना केलं आहे. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या नावाचा वापर करून लेखन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून देहू संस्थान आक्रमक झाले आहे. नक्की वाचा: Ketaki Chitale Case: 'एखाद्याचे वडील मरावेत असे कोणी बोलते का? ही विकृती समाजासाठी वाईट आहे...'; केतकी चितळे प्रकरणावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया .

केतकी चितळेच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट प्रकरणी 13 विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ठाणे, अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा याठिकाणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकीने फेसबूकवरून पोस्ट डिलिट करण्यालाही विरोध केला होता. त्यानंतर अटक करून नेताना एनसीपी कार्यकर्त्यांनी केतकीवर अंडी फेकण्याचा, शाई फेक केल्याचा शनिवार (14 मे) दिवशी प्रकार घडला होता.