Keshav Upadhya on Thackeray Government: 12 वी चा निकाल लांबल्याने केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपूनही 12 वीचा निकाल जाहीर न झाल्याने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) यंदाच्या 10 वी, 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाला असून बारावीचे विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुदत संपूनही 12 वीचा निकाल जाहीर न झाल्याने भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhya) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. "ठाकरे सरकारला ना सर्वोच्च न्यायालयाची तमा ना बारावीच्या विद्यार्थ्यांची काळजी," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर ठाकरे सरकारने न्यायालयाचा अवमान केला असून ते लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोणतेही स्पष्टीकरण न दिल्याचे उपाध्ये यांनी म्हटलं आहे. (माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर)
केशव उपाध्ये ट्विट्स:
दरम्यान, राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाबद्दल माहिती देताना सांगितले की, राज्यातील पाऊस, पुरपरिस्थिती यामुळे काही भागातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली आहे. नैसर्गित आपत्ती असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु, निकालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही दिवसांतच निकाल जाहीर करण्यात येईल.