माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडले आहे.

माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर
Keshav Upadhye And Nawab Malik (Photo Credits: FB and ANI)

मराठा आरक्षणासंबंधी कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र केंद्रानं 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी "सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार?" असा सवाल केला होता. यावर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

नवाब मलिक यांनी "फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?" असं म्हणत भाजपाने माशा मारण्याची स्पर्धा भरवावी, अशा आशयाचे ट्विट केले होते. या ट्विटला केशव उपाध्ये यांनी उत्तर दिले आहे.हेदेखील वाचा- Nawab Malik on Devendra Fadnavis: 'तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?' नवाब मलिक यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?" असं म्हणत भाजपाने माशा मारण्याची स्पर्धा भरवावी,

"माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत" असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच, "आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? १० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!" असं देखील उपाध्ये यांनी नवाब मलिक यांना उद्देशून म्हटलं आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!”, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी फडणवीसांवर केलेली आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2021 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).