Katraj Dairy Milk Price Hike: कात्रज डेअरी दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ
Milk Cost May 2025: खरेदी आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे कात्रज डेअरीने १२ मे पासून दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रूपयांची वाढ केली आहे. फुल क्रीम दुधाची किंमत आता पुण्यात ₹74/लिटर झाली आहे.
Dairy Product Rates: पुणे जिल्हा दूध संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कात्रज डेअरी (Katraj Dairy) ने आपले दूध दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवले (Milk Price Hike) आहेत. ही नवी दरवाढ 12 मे पासून लागू झाली आहे. वाढलेला खरेदी खर्च, वाहतूक शुल्क आणि वाढत्या कामकाजाच्या खर्चामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले. दरम्यान, अलिकडेच चितळे, गोकूळ यांसारख्या दूध संघांनी आपापल्या दूध दरांमध्ये वाढ केल्यानंतर आता कात्रजनेही तोच कित्ता गिरवत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला आहे. यामुळे दूध संघांचा फायदा होणार असला तरी, खरेदीदार ग्राहकांना मात्र खिशावर ताण सहण करावा लागणार आहे.
कसे आहेत वाढलेले दूध दर?
कात्रज दूध दर मार्च 2024 मध्ये वाढले होते. त्यानंततर वर्षही उलटायच्या आत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. नवीन दरांसह, फुल क्रीम दूध आता ₹72 वरून ₹74 प्रति लिटर होईल, तर प्रमाणित दूध ₹62 वरून ₹64 प्रति लिटर दराने विकले जाईल. या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना लिमये म्हणाले, 'उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाल्यामुळे संचालक मंडळाने दर सुधारणेला एकमताने मान्यता दिली.' त्यांनी पुढे सांगितले की, उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे दूध संकलनात घट झाली आहे, तर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे.
प्रशासनाने दूध दर वाढीचे कारण सांगताना, उष्ण हंगामात चारा आणि पाण्याची कमतरता असल्याचेही नमूद केले आहे, ज्यामुळे दुग्ध उत्पादन खर्च वाढला आहे. प्रतिसादात, सातत्यपूर्ण पुरवठा आणि योग्य भरपाईसाठी डेअरीला शेतकऱ्यांना पैसे वाढवावे लागले आहेत. खरेदी आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे, दूध विक्री किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे, असेल लिमये म्हणाले. सुधारित किमतींचा परिणाम पुण्यातील दैनंदिन घरगुती बजेटवर होण्याची अपेक्षा आहे, जिथे कात्रज डेअरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)