Kasturi Savekar Scales Mount Everest: कोल्हापुरची कन्या कस्तुरी सावेकरने सर केलं माउंट एव्हरेस्ट

हे शिखर सर करणारी कस्तुरी सावेकर ही जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली होती.

Kasturi Savekar (PC - Instagram)

Kasturi Savekar Scales Mount Everest: कोल्हापूर (Kolhapur) ची कन्या कस्तुरी सावेकर (Kasturi Savekar) ने माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर केलं आहे. कस्तुरीच्या या यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कस्तुरीने 14 मे रोजी पहाटे 6 वाजता जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. तिच्या या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

कस्तुरी सावेकरसह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले. या ग्रूपमध्ये कस्तूरी एकमेव भारतीय आहे. यासंदर्भात फेसबुक पेजवरून नुकतीच घोषणा करण्यात आली. दरम्यान, सावेकर कुटुंबीयांतर्फे कस्तुरीच्या एव्हरेस्ट मोहिमेसंदर्भात अधिकृत माहिती पत्रकार परिषदेद्वारे देण्यात येणार आहे. (हेही वाचा - Priyanka Mohite, सातार्‍याची 30 वर्षीय गिर्यारोहक ठरली कांचनगंगा शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला)

कस्तुरी सावेकरने गतवर्षी देखील माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटचाच टप्पा राहिला असताना खराब वातावरणामुळे तिला मोहिम तिथेच थांबवून पुन्हा परतावे लागले होते. परंतु, एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द तिने सोडली नाही. आज तिने एव्हरेस्ट सर करून संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kasturi Savekar | Mountaineer (@mountaineerkasturi)

अन्नपूर्णा शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक -

कस्तुरीने यापूर्वी अन्नपूर्णा शिखर देखील सर केले आहे. हे शिखर सर करणारी कस्तुरी सावेकर ही जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली होती. मागील आठवड्यातच तिने कामगिरी करून दाखवली होती. कस्तुरी 24 मार्चला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाली होती. या मोहिमेतील सरावाचा भाग म्हणून कस्तुरीने जगातील चौदा अष्टहजारी शिखरांपैकी सर्वांत अवघड व खडतर असणाऱ्या दहाव्या क्रमांकाचे शिखर माऊंट अन्नपूर्णा निवडले होते. कस्तुरीने हे शिखर यशस्वीरित्या सर केले. हे शिखर सर करणारी कस्तुरी जगातील सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली. आज तिने माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करून कोल्हापूरचा नवा इतिहास घडवला आहे.