Pandharpur Shocker: पंढरपूरमधील करकंबमध्ये दोन सख्ख्या भावांसह तिघांचा शेतातील तलावात बुडून मृत्यू

या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील करकंब (Karakamb) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात  पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मनोज अंकुश पवार (वय 11 वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय 7 वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय 9 वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं.   (हेही वाचा - Beed Accident: पिकअप आणि कंटेनरची जोरदार धडक, बीड येथील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू)

करकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना घडली. या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककळा पसरली आहे. या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककळा पसरली आहे.

संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.