Kangana Ranaut vs BMC: कंगना रनौत हिचे ऑफिस पाडण्याचा सर्वस्वी निर्णय महापालिकेचा; राज्य सरकारची यामध्ये भुमिका नाही- शरद पवार

तिच्या समर्थकांनी तिला नुकसानभरपाई देण्यात यावी असे सुद्धा म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले मत मांडले आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

Kangana Ranaut vs BMC: बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईला पाकव्याप्त कश्मीरची (POK) उपमा दिल्यानंतर सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच कंगना हिचे मुंबईतील वांद्रे येथे स्थित असलेले ऑफिस महापालिकेने (BMC)   24 तासांची नोटीस बजावल्यानंतर सुद्धा त्यावर काही उत्तर न आल्याने पाडले. पण आता कंगना हिचे ऑफिस पाडण्याच्या प्रकरणावरुन आता राजकरण तापले आहे. तिच्या समर्थकांनी तिला नुकसानभरपाई देण्यात यावी असे सुद्धा म्हटले आहे. याच पार्श्वभुमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले मत मांडले आहे.(Kangana Ranaut vs BMC: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्येत स्वागत केले जाणार नाही, VHP चा निर्णय)

शरद पवार यांनी असे म्हटले आहे की, कंगना हिचे ऑफिस पाडण्याचा सर्वस्वी निर्णय महापालिकेचा होता. यामध्ये राज्य सरकारची कोणतीही भुमिका नाही. महापालिकेने नियम आणि अटींनुसार सर्व काही केले आहे. दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी सुद्धा अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले होते.(Kangana Ranaut on Sonia Gandhi: BMC कडून ऑफिसवर झालेल्या कारवाईनंतर कंगना रनौत हिने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना विचारले 'हे' प्रश्न View Tweet)

दरम्यान, कंगना हिने मुंबई बद्दल केलेल्या विधानानंतर संजय राऊत यांनी तिच्यावर सातत्याने टीका केली आहे. तसेच महापालिकेने आता कंगना जेव्हा मुंबईत आली त्यावेळी तिच्यासह बहीण रंगोली चंडेल यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला आहे. परंतु कंगना यावर शांत बसणार नाही असे दिसून येत आहे. ऐवढेच नाही तर तिने एका व्हिडिओतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी मध्ये उल्लेख केल्याचे दिसून आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif